गुन्हेजळगाव

परवानगी नसताना महाराष्ट्रात खत विक्री; गुजरातच्या कंपनीविरोधात गुन्हा

परवानगी नसताना महाराष्ट्रात खत विक्री; गुजरातच्या कंपनीविरोधात गुन्हा

जळगाव: महाराष्ट्र राज्यात खत विक्रीची परवानगी नसतानाही गुजरातमधील कंपनीकडून खतांची अनधिकृत विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीचे प्रतिनिधी व जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील पानोली येथील सिडनी फॉर्म्युलेशन अँड केमिकल्स या कंपनीने महाराष्ट्रात खत उत्पादन व विक्रीसाठी आवश्यक परवानगी नसतानाही थेट व्यवहार केले. या माध्यमातून १८ हजार २० रुपयांची रक्कम यूपीआयद्वारे स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीने विहित नमुन्यातील M-Form मध्ये खत विक्रीचे बिल न देता नियमबाह्य व्यवहार केले. तसेच WhatsApp, QR कोड आणि ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून थेट विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक व दिशाभूल केली.

कंपनीचे जबाबदार व्यक्ती विनोद एन. रणपरीया यांनी २० ऑगस्ट रोजी दिलेल्या खुलाशात गुजरात राज्यातील परवाना असल्याचे मान्य केले, मात्र महाराष्ट्रातील परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, कीटकनाशक अधिनियम १९६८ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button