गुन्हेजळगाव

जळगाव जिल्ह्यातून तिघे दोन वर्षांसाठी हद्दपार

जळगाव : विविध पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील तीन अट्टल गुन्हेगारांवर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (वय २३), पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर (वय २३) व आकाश उर्फ आक्या ब्रो रविंद्र मराठे (वय २२, सर्व रा. तुकारामवाडी) अशी हद्दपार करण्यात आलेल्या तिघांची नावे असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारांची संख्या वाढली असून ह्या गुन्हेगारांवर वचक बसावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कठोर पावले उचलली आहेत. तुकाराम वाडी वाडी परिसरातील आकाश उर्फ खंड्या ठाकूर याच्यावर सात, पवन उर्फ बद्या बाविस्कर याच्याविरुद्ध सहा तर आकाश उर्फ आक्या ब्रो मराठे याच्याविरुद्ध खूनासह चार गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठविला होता.

त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी  तिघांच्या हद्दपारीचे आदेश पारित होताच, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक राहूल तायडे, चंद्रकांत धनके, योगेश बारी, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश घुगे यांच्या पथकाने तिघांना जिल्ह्यातून हद्दपार केले.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button