जळगावशैक्षणिक

नूतन मराठा महाविद्यालयाच्या बारावी च्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनीची उत्तुंग यश, बारावीचा एकूण 98 टक्के निकाल

नूतन मराठा महाविद्यालयाच्या बारावी च्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनीची उत्तुंग यश, बारावीचा एकूण 98 टक्के निकाल

जळगाव प्रतिनिधी नूतन मराठा महाविद्यालयाच्या बारावीचा निकाल एकूण 98 टक्के लागला असून विज्ञान विभागाचा निकाल 99.62%, वाणिज्य विभागाचा निकाल 98.35% , कला विभागाचा निकाल 93.98% व किमान कौशल्य चा निकाल शंभर टक्के लागला असून बारावी विज्ञान विभागात अथर्व संजय पाटील याला 90.33% मार्क मिळवून तो प्रथम आला असून भूमिका संदीप मोरे या विद्यार्थिनीस 90.17% मार्क मिळाले असून ती महाविद्यालयात दुसरी आली , रोहन प्रदीप शेकोकर 87% असून तो महाविद्यालयात तृतीय आलाआहे, तसेच वाणिज्य विभागात आदेश शामकांत वासुलकर हा 76 टक्के मिळून महाविद्यालयात प्रथम आला ,.कुमारी हर्षदा रामराव पाटील हिला ७२.६७% मिळाले असून ती महाविद्यालयात दुसरी आलेली आहे, तर रोहित ताराचंद चव्हाण 70.50% मिळून महाविद्यालयात तृतीय आला आहे, तसेच कला विभागात प्रणव गणेश श्याम बागुल यास 75.50% मिळाले असून तो प्रथम आलेला आहे.

तर विद्यार्थिनी देविका संजय सपकाळे 73.83% मिळून महाविद्यालयात द्वितीय आलेली आहे व जनकेश हिरालाल भिलाला 73.17% मिळाले असून महाविद्यालयात तो तिसरा आलेला आहे, संस्थेचे मानद सचिव  निलेश  भोईटे ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख , जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, प्रा.डी .वाय . पाटील, प्राध्यापक लोंढे सर, प्रा. संजय पुरी सर सर्व ज्युनिअर विभागातील प्राध्यापक व प्राध्यापिका यांनी यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button