जळगावसामाजिक

हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर असोसिएशन आणि रोटरी क्लब जळगावच्या संयुक्त विद्यमाने मोफत महा आरोग्य शिबिर संपन्न

हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर असोसिएशन आणि रोटरी क्लब जळगावच्या संयुक्त विद्यमाने मोफत महा आरोग्य शिबिर संपन्न

जळगाव मीडिया न्यूज डेस्क l हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर असोसिएशन आणि रोटरी क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गणपती परिसरातील रोटरी क्लब हॉल येथे भव्य मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातून तब्बल ३०० नागरिकांनी विविध वैद्यकीय सेवा घेत लाभ मिळवला.

या महा शिबिरात दातांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, महिलांची डोळे तपासणी, लहान मुलांचे आरोग्य परीक्षण, नाक तपासणी, आयुर्वेदिक रोग निदान तसेच जनरल तपासणी करण्यात आली. विशेषतः डोळ्यांची तपासणी करून गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय १४ नागरिकांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी पुढील उपचाराची तारीखही देण्यात आली.

या उपक्रमात बिल्डिंग पेंटर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच रोटरी क्लब जळगावचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या आरोग्यसेवेसाठी दोन्ही संस्थांनी मिळून उचललेला हा उपक्रम नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळवत यशस्वी ठरला.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button