गुन्हेजळगावराज्य

भुसावळच्या महावितरण उप अभियंत्याला २० हजारांची लाच घेतांना अटक

जळगाव लाचलुचपत विभागाची कारवाई

भुसावळच्या महावितरण उप अभियंत्याला २० हजारांची लाच घेतांना अटक

जळगाव लाचलुचपत विभागाची कारवाई

जळगाव प्रतिनिधी

लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने भुसावळ येथील महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला २० हजार रुपयाची लाच घेतांना अटक केली असून त्याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत प्रभाकर इंगळे वय-४६, रा. भुसावळ असे अटक केलेल्या अभियंत्यांचे नाव आहे.

शासकीय विद्युत ठेकेदार म्हणून तक्रारदार काम करतात.भुसावळ येथील उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्याकडे त्यांनी एका खाजगी कंपनीचा एलएससीच्या स्कीम अंतर्गत नवीन सर्विस कनेक्शन क्षमता वाढ 100 वॅट वरून 200 वॅट करण्याकरता प्रस्ताव सादर केला होता. उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली होती.

मात्र तडजोडी अंती अखेर २० हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदर यांनी जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक पथकाला तक्रार केल्यावरून पथकाने आज बुधवारी २२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचून महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांना २० हजार रुपये घेताना रागेहात पकडले. या कारवाईमुळे महावितरण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

यांनी केली कारवाई

एसीबी चे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button