गुन्हेजळगाव

गच्चीवर झोपलेल्या तरुणीचा विनयभंग; जाब विचारणाऱ्यांवर धारदार हत्याराने हल्ला

गच्चीवर झोपलेल्या तरुणीचा विनयभंग; जाब विचारणाऱ्यांवर धारदार हत्याराने हल्ला

जळगाव (प्रतिनिधी) – गच्चीवर झोपलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांवर संशयिताने धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीचा मामा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना दापोरा येथे घडली.

फिर्यादी कुटुंबीय आपल्या घराच्या गच्चीवर झोपले होते. मध्यरात्री भाचीच्या आरडाओरड्याने ते जागे झाले. त्यांनी पाहिले असता, विनोद अरुण सोनवणे हा पळून जाताना दिसला. पीडित तरुणीने सांगितले की, झोपेत असताना कोणीतरी तिच्या पायाला स्पर्श करत असल्याचे जाणवले. जाग येताच विनोद सोनवणे पायाजवळ उभा असल्याचे तिला दिसले, त्यामुळे तिने घाबरून आरडाओरड केली.

सकाळी या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी कुटुंबीय विनोद सोनवणेच्या घरी गेले असता, त्याने त्यांना शिवीगाळ केली व अचानक मारहाण सुरू केली. यावेळी विनोदने घरातून धारदार शस्त्र आणून तरुणीच्या मामावर हल्ला केला. त्याच्या पोटात वार करत खांद्यावर देखील गंभीर जखम केली.

जखमी अवस्थेत तरुणीच्या मामाला तातडीने जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी विनोद सोनवणेविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button