जळगाव

सुरत भुसावळ रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली 

सुरत भुसावळ रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली 

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळील घटना, रेल्वे वाहतूक ठप्प

अमळनेर जळगाव मीडिया न्यूज डेस्क l गुरुवारी (दि. १५ मे २०२५) दुपारी दोन वाजेच्या सुमारास भुसावळहून नंदुरबारकडे निघालेली मालगाडी अमळनेरजवळील प्रताप महाविद्यालय परिसरात रुळावरून घसरली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, लोको पायलट आणि गार्ड सुखरूप आहेत.

मात्र, या घटनेमुळे सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, ज्यामुळे प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होऊन प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.मालगाडीचे काही डबे रुळावरून घसरल्याने आजूबाजूच्या रेल्वे मार्गाचेही गंभीर नुकसान झाले आहे. अमळनेर रेल्वे स्थानकापासून जवळच ही घटना घडल्याने रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, रुळ आणि मार्ग पूर्ववत करण्यासाठी रेल्वे कर्मचारी आणि तांत्रिक पथके अहोरात्र झटत आहेत.अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

 

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button