जळगावराजकारणसामाजिक

जळगाव महानगरपालिका रणधुमाळी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या शहरात भव्य रोड शो; महायुतीचे शक्तीप्रदर्शन

जळगाव महानगरपालिका रणधुमाळी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या शहरात भव्य रोड शो; महायुतीचे शक्तीप्रदर्शन

जळगाव (प्रतिनिधी):

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, महायुतीने निवडणुकीत निर्णायक आघाडी घेण्याच्या उद्देशाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या प्रचाराचा मुख्य भाग म्हणून उद्या, मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा शहरात भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण असून जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

​हा भव्य रोड शो उद्या दुपारी ठीक ३ वाजता शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होणार आहे. येथून हा ताफा नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक आणि व्यापारी केंद्र असलेल्या गोलाणी मार्केट मार्गे मार्गक्रमण करेल. यानंतर रोड शोची सांगता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेच होईल. या संपूर्ण मार्गावर मुख्यमंत्री फडणवीस जनतेशी संवाद साधणार असून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करणार आहेत.

​जळगाव महापालिकेच्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अशी महायुती मैदानात उतरली आहे. या रोड शोमध्ये महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, प्रमुख नेते, जिल्हा पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने महायुतीकडून मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार असून, शहराच्या भविष्यातील विकासाचा संकल्प याद्वारे मांडला जाणार असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

​या ऐतिहासिक रोड शोसाठी शहरातील प्रमुख चौकात स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. व्यापारी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या दौऱ्याबाबत मोठे कुतूहल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button