गुन्हेजळगाव

जळगावात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; देहविक्रीच्या दलदलीतून परप्रांतीय तरुणींची मुक्तता

जळगावात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; देहविक्रीच्या दलदलीतून परप्रांतीय तरुणींची मुक्तता

​‘स्पा ९९’ चा मालक आणि जागामालकावर जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा; नेपाळी महिलेच्या कागदपत्रांची तपासणी सुरू

​जळगाव | प्रतिनिधी:
जळगाव शहरातील स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या बेकायदेशीर कारवायांवर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. रिंगरोड परिसरातील आरसी टॉवरमध्ये चालणाऱ्या ‘स्पा ९९’ वर दामिनी पथकाने अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये छापा टाकून सहा महिलांची सुटका केली. या प्रकरणी स्पा चालक आणि जागामालकावर गुन्हे दाखल झाल्याने शहरातील स्पा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
​पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा आणि थेरपी सेवेच्या आडून ग्राहकांना अनैतिक सेवा पुरविल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून दामिनी पथक आणि मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने संयुक्तपणे योजना आखून आरसी टॉवरमधील ‘स्पा ९९’ वर छापा टाकला. या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या सहा महिलांमध्ये मणिपूर, सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि नेपाळ येथील तरुणींचा समावेश आहे. यातील नेपाळ रहिवासी असलेल्या तरुणीच्या भारत वास्तव्याबाबतच्या व्हिसा आणि सीमापार प्रवासाच्या कायदेशीर कागदपत्रांची बारकाईने चौकशी केली जात आहे. या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार आणि स्पा परवानाधारक नीरजसिंग पंड्या याच्यासह बेकायदेशीर कामासाठी जागा भाड्याने देणारा जागामालक राजेंद्र पुंडलिकराव चव्हाण या दोघांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केवळ एका स्पावर कारवाई करून न थांबता, शहरातील सर्वच स्पा आणि मसाज सेंटर्सचे परवाने, तेथील कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र व प्रत्यक्ष कामाचे स्वरूप तपासण्याची आग्रही मागणी आता पुढे येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button