गुन्हेजळगाव

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; पिंप्री गावाजवळील घटना

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; पिंप्री गावाजवळील घटना
धरणगाव प्रतिनिधी

एका अवजड वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार इसम ठार झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळील हॉटेल साई पॅलेस समोर ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुरूषोत्तम अत्तरदे वय ५५ रा. साळवे ता. धरणगाव असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेलुआ माहिती नुसार पुरूषोत्तम अत्तरदे हे ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जळगाव येथे कामाच्या निमित्ताने त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच १९ आर २६७९ ने जात असतांना पिंप्री गावाजवळील हॉटेल साई पॅलेस समोर एका ट्रकने पुरूषोत्तम अत्तरदे रा. साळवा यांच्या दुचाकीचा जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये अत्तरदे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करत मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button