गुन्हेजळगाव

भुसावळ शहरात तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून !

शहरात खळबळ : चौघांचा शोध सुरू

भुसावळ (प्रतिनिधी ) ;- शहरात कुणाच्या घटना नित्याची बाब झाली असून आज पुन्हा एकदा एका 27 वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून निघून खून झाल्याचे घटना जाम बोलला भागात या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून हा खून जुन्या वादातून झाला असल्याचे समोर येत आहे.तेहरीन नासीर शेख (27, मचछीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,सकाळी चहा पिण्यासाठी गेलेल्या तेहरीन नासीर शेख  याच्यावर जाम मोहल्ला भागातील  डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात  दोन दुचाकीवर तोंडाला रूमाल बांधून आलेल्या चौघांपैकी तिघांनी आपल्याकडील गावठी पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये प्रचंड खळबळ उडून धावपळ उडाली.

शरीरातील विविध भागात गोळ्या लागल्याने तेहरीनचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी धाव घेतली. पोलिसांनी तपासचक्र विभागात फिरवली आहे.

 

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button