राजकारणशासकीय

जळगावात मुस्लिम बांधवांसोबत भाजपकडून ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याला मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

जळगाव मीडिया ( वसीम खान )

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे जळगाव शहरात मुस्लिम बांधवांसोबत श्रवण करण्यात आले. यावेळी भाजपचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष प्रवेज पठाण यांच्या उपस्थितीत महिला, कार्यकर्ते तसेच जळगाव शहरातील नगरसेवक जाकीर पठाण यांनी मुस्लिम समाज बांधवांसोबत कार्यक्रम पाहिला.

 

यावेळी उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध लोककल्याणकारी योजनांवर आणि देशाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांवर चर्चा केली. समाजातील विविध घटकांपर्यंत विकासाचा लाभ पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा उल्लेख करण्यात आला.

 

मुस्लिम समाजातील अनेक नागरिक केंद्र सरकारच्या योजनांबाबत सकारात्मक भूमिका घेत असून, देशाच्या विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला समर्थन मिळत असल्याचे मत उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

 

कार्यक्रमादरम्यान देशहित, सामाजिक एकता आणि विकासाच्या दिशेने पुढे जाण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित महिला व कार्यकर्त्यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून प्रेरणा घेतली.

 

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button