सामाजिक
महापौर दीपमाला काळे यांचा वाढदिवसानिमित्त भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

जळगाव मीडिया ( वसीम खान ) : महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपजिल्हाध्यक्ष दीपक परदेशी, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष परवेज पठाण तसेच उपजिल्हाध्यक्ष वसीम खान उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी महापौर दीपमाला काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व प्रशासकीय कार्याबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महापौरांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.



