गुन्हेजळगाव

जुन्या वादातून घरात घुसून कोयत्याचा धाक; सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

जुन्या वादातून घरात घुसून कोयत्याचा धाक; सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव: जळगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणाच्या घरात बेकायदेशीरपणे घुसून कोयत्याच्या धाकावर जीवे मारण्याची धमकी देत घरावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मीनगर येथील रहिवासी आकाश अजय सोनार (वय २६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास बबलू हीरामण धनगर, अविनाश राठोड, गणेश दंडगव्हाळ, जिगर बोंडारे आणि त्यांच्यासोबत आलेल्या ३ अज्ञात साथीदारांनी संगनमताने आकाश यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. आरोपींच्या हातात कोयता होता. त्यांनी फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करत “आकाश कुठे आहे, आज त्याचा मर्डर करतो,” अशी धमकी दिली.

फिर्यादी घरात न सापडल्याने आरोपींनी घराबाहेर येऊन घरावर जोरात दगडफेक करत परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ६३९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ३३३, १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रमेश चौधरी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button