शासकीय
आता फक्त ‘मिसिंग’ची नोंद नाही चालणार; प्रत्येक बेपत्ता व्यक्तीसाठी थेट ‘अपहरणाचा’ गुन्हा दाखल होणार!

जळगाव मीडिया प्रतिनिधी: सुधारित कार्यपद्धती जाहीर: सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि गृह खात्याच्या आदेशानुसार बेपत्ता व्यक्तींच्या तपासाबाबत नवीन कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.
‘मिसिंग’ नोंद बंद: आता कोणत्याही वयोगटातील व्यक्ती बेपत्ता झाल्यास केवळ हरवल्याची (‘मिसिंग’ची) नोंद न करता थेट अपहरणाचा गुन्हा दाखल केला जाईल.
तपासाला मिळणार गती: गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलिसांना तात्काळ तपास करणे बंधनकारक होणार असून, यामुळे बेपत्ता व्यक्तींचा शोध वेगाने लागण्यास मदत होईल.
‘गोल्डन अवर्स’मध्ये कडक पावले: व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच वयाचा किंवा स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव न करता वेळेचा अपव्यय टाळून तात्काळ तपास सुरू करणे बंधनकारक असेल.



