
पाळधी बायपासवर कंटेनर उलटून भीषण अपघात; दोनगाव येथील तरुणाचा जागीच मृत्यू
प्रतापराव पाटील अन् विक्रम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत केली मदत; दोनगाववर शोककळा
पाळधी : पाळधी बायपास रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या कंटेनरचा ताबा सुटून तो पलटी झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात दोनगाव बुद्रुक (ता. धरणगाव) येथील किरण जनार्दन सोनवणे (वय २०) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत किरण हा कॉलेजचे शिक्षण घेत होता.
घटनेचे वृत्त समजताच पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. रुग्णवाहिका बोलावून पुढील कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रियेसाठी यंत्रणा वेगाने हलवली. या दुर्दैवी घटनेमुळे दोनगाव बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.




