गुन्हेजळगाव

आठ गुन्ह्यांतील तब्बल ९३० किलो गांजाचा साठा पोलिसांकडून नष्ट

आठ गुन्ह्यांतील तब्बल ९३० किलो गांजाचा साठा पोलिसांकडून नष्ट

जळगाव : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अमली पदार्थविरोधी कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला तब्बल ९३० किलो ८२ ग्रॅम वजनाचा गांजा सोमवारी (दि. ६ जुलै) पोलिसांनी नियमानुसार नष्ट केला. जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या मागील मोकळ्या जागेत ही कारवाई पार पडली.

पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये आठ वेगवेगळ्या गुन्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर गांजाचा साठा जप्त केला होता. या जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ कोटी ८६ लाख १६ हजार ४०० रुपये इतकी आहे. न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीच्या उपस्थितीत संपूर्ण कार्यवाही पार पाडण्यात आली.

समितीच्या देखरेखीखाली खड्डा तयार करून जप्त केलेला गांजा नष्ट करण्यात आला. जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जात असून, अशा कारवायांमुळे अमली पदार्थ तस्करीला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक , अपर पोलिस अधीक्षक , उपविभागीय पोलिस अधिकारी (गृह) , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक , कृषी विभागाचे प्रतिनिधी विकास बोरसे, वजन-मापे निरीक्षक गौतम बाविस्कर तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button