सामाजिक

इमदाद ग्रुप फाउंडेशनचा माणुसकीचा उपक्रम; गरजूंसाठी मदतीचा हात पुढे

जळगाव मीडिया ( वसीम खान )  : समाजातील गरीब, मिस्कीन, यतीम आणि गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी इमदाद ग्रुप फाउंडेशन जळगाव शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. गरिब मुलांच्या शिक्षणासाठी मदत, अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना आधार, जेलमध्ये असलेल्या व्यक्तींच्या घरांपर्यंत राशन-किराणा पोहोचवणे, रुग्णालयातील उपचार व औषधांच्या बिलांसाठी मदत अशा अनेक सामाजिक कामांमध्ये फाउंडेशन कार्यरत आहे.

पवित्र रमजान महिन्यात गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप करून मदतीचा उपक्रम राबविण्यात येतो. तसेच जकात, फितरा, खैरात, सदका, बँक इंटरेस्टची रक्कम किंवा राहे खुदाच्या माध्यमातून समाजसेवेसाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गरजूंच्या सेवेसाठी इच्छुक नागरिकांनी QR Code द्वारे किंवा फोन पे क्रमांक 8669015032 (साजिद रहमान शेख – सचिव) यावर मदत पाठवावी. तसेच रोख मदतीसाठी अब्दुल अजीज सालार (अध्यक्ष) – 9822055914 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“ही मदत म्हणजे सवाब-ए-जारिया समजून समाजातील प्रत्येकाने सहकार्य करावे,” असे आवाहन इमदाद ग्रुप फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

मिनजानिब : अब्दुल अजीज सालार, साजिद रहमान शेख, मो. अशफाक बागवान, मजीद सेठ नेरीवाले, मुश्ताक अहमद, मो. इकबाल, सैय्यद शाहिद मेंबर, मुफ्ती अतिक्रुरहमान, कादिर गौस मोहम्मदभाया, डॉक्टर रिजवान खाटीक, साजिद अजीज सालार, रईस अ. गफ्फार कुरेशी.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button