राजकारणराज्यशासकीय

महाराष्ट्रात या 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार ! पहा नवीन जिल्ह्यांची यादी

मुंबई वृत्तसंस्था ;- महाराष्ट्रात प्रशासनिक सोयीसुविधा सुधारण्यासाठी आणि स्थानिक विकासाला चालना देण्यासाठी २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांमधून काही जिल्ह्यांचे विभाजन करून या नव्या जिल्ह्यांची रचना केली जाईल. हा निर्णय २६ जानेवारी २०२५ रोजी अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली, तेव्हा राज्यात फक्त २५ जिल्हे होते. लोकसंख्या वाढ आणि प्रशासकीय गरजांमुळे जिल्ह्यांचे पुनर्गठन हळूहळू झाले. २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्हा तयार करण्यात आला होता. २०१८ मध्ये राज्य सरकारने २२ नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर केला होता, ज्यातील २१ जिल्ह्यांचा समावेश सध्याच्या प्रस्तावात करण्यात आला आहे.
प्रस्तावित नवीन जिल्ह्यांची यादी
नवीन जिल्ह्यांमध्ये पुढील शहरांचा समावेश होईल. भुसावळ, उदगीर, अंबेजोगाई, मालेगाव, कळवण, किनवट, मीरा-भाईंदर, कल्याण, माणदेश, खामगाव, बारामती, पुसद, जव्हार, अचलपूर, साकोली, मंडणगड, महाड, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, आणि अहेरी.
नवीन जिल्ह्यांचे फायदे
1) प्रत्येक जिल्ह्याचा आकार कमी झाल्यामुळे स्थानिक प्रशासन अधिक प्रभावी होईल.
2) ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये विकासाचा वेग वाढेल, आणि दूरवरच्या भागांपर्यंत शासकीय सेवा पोहोचतील.
3) बारामती, मालेगाव, आणि मीरा-भाईंदर यांसारख्या भागांमध्ये औद्योगिक आणि शैक्षणिक विकासाला गती मिळेल.
4) नागरिकांच्या समस्यांचे निराकरण अधिक वेगाने होईल.
अडचणी काय आहेत?
1) नवीन जिल्ह्यांसाठी मुख्यालय, सरकारी कार्यालये, आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल आवश्यक आहे.
2) नव्या जिल्ह्यांसाठी प्रशासकीय व्यवस्था उभारणे आणि कर्मचारी वर्ग नियुक्त करणे हे आव्हानात्मक ठरू शकते.
3) जिल्ह्यांच्या सीमांचे विभाजन करताना स्थानिक लोकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवीन जिल्ह्यांची प्रस्तावित यादी आणि मूळ जिल्हा

भुसावळ (जळगाव)

उदगीर (लातूर)

अंबेजोगाई (बीड)

मालेगाव (नाशिक)

कळवण (नाशिक)

किनवट (नांदेड)

मीरा-भाईंदर (ठाणे)

कल्याण (ठाणे)

माणदेश (सांगली/सातारा/सोलापूर)

खामगाव (बुलडाणा)

बारामती (पुणे)

पुसद (यवतमाळ)

जव्हार (पालघर)

अचलपूर (अमरावती)

साकोली (भंडारा)

मंडणगड (रत्नागिरी)

महाड (रायगड)

शिर्डी (अहमदनगर)

संगमनेर (अहमदनगर)

श्रीरामपूर (अहमदनगर)

अहेरी (गडचिरोली)

1998 नंतर प्रस्‍ताव
राज्यात १९८८ नंतर दहा जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या ३६ जिल्हे २८८ तालुके आहेत. मात्र, सध्या अस्तित्वात असलेले जिल्हे काही तालुक्यांची ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या गैरसोयींची असल्याचे सांगून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जनतेच्या मागणीनुसार जिल्हा तालुकानिर्मितीची मागणी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button