सामाजिक

जिल्हा कार्याध्यक्ष नदीम अब्दुल गफ्फार मलिक यांच्या पुढाकाराने मतदार सेवा शिबिर

BLO SIR कडून मिळणार नागरिकांना संपूर्ण मार्गदर्शन

जळगाव मीडिया (वसीम खान) :

मतदार यादीतील नाव नोंदणी, दुरुस्ती तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी जळगाव येथे BLO मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पत्ता बदल, नवीन मतदार नोंदणी यांसह आवश्यक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

हे शिबिर रविवार दिनांक ५/७/२०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत नॅशनल हॉल, शनि पेठ, डॉ. अब्दुल गफ्फार मलिक हाऊस जवळ, वॉर्ड क्रमांक ४ येथे आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेला अधिक सुलभ करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

(आयोजक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजित पवार गट, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष नदीम अब्दुल गफ्फार मलिक यांच्या पुढाकाराने)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button