गुन्हेजळगावसामाजिक

उजाड कुसुंबा येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

उजाड कुसुंबा येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : तालुक्यातील उजाड कुसुंबा येथे एका वृद्धाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अत्तरसिंग चमारसिंग पावरा (वय ७०, रा. उजाड कुसुंबा, ता. जळगाव) हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. बुधवारी दुपारी गावातील मराठी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला त्यांनी गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

कारण अस्पष्ट; पोलिसांत नोंद
आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे करीत आहेत.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button