गुन्हेजळगाव

एक महिन्याचं बाळ ट्रेनमध्ये सोडून आई-वडील पसार

एक महिन्याचं बाळ ट्रेनमध्ये सोडून आई-वडील पसार

अमळनेर रेल्वे स्थानकावर धक्कादायक प्रकार

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर रेल्वे स्थानकावर एक अजब आणि धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याला रेल्वेच्या डब्यात सोडून त्याचे आई-वडील पसार झाल्याची घटना गुरुवारी (९ मे) रात्री उशिरा उघडकीस आली. सध्या पोलिस याप्रकरणाचा तपास करत असून, या कृतीमागचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

भुसावळ-सुरत पॅसेंजर ट्रेनच्या सामान्य डब्यात एक दांपत्य धरणगाव स्थानकावरून एक महिन्याचं बाळ घेऊन चढलं. त्यांनी बाळासाठी डब्यात झोका बांधला होता. मात्र, अमळनेर स्थानक आल्यानंतर दोघंही बाळाला झोक्यातच सोडून गुपचूप ट्रेनमधून उतरले आणि पळ काढला.

दोंडाईचा स्थानक पार झाल्यानंतर डब्यातील काही प्रवाशांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. रेल्वे पोलीस अनिता चौधरी आणि अलका अढाळे यांनी दोंडाईच्यानंतर बाळाची जबाबदारी स्वीकारली आणि ते नंदुरबार रेल्वे स्थानकावर उतरवून बाळाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं.

याप्रकरणी रेल्वे पोलीस अधिकारी अनिता चौधरी यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अलका अढाळे अधिक तपास करत आहेत. बाळाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button