गुन्हेजळगाव

लग्नासाठी अल्पवयीन मुलीला धमकी देणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

भडगावः– तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला शाळेत जात असताना तिचा हात पकडून लग्नासाठी धमकी देणाऱ्या एका तरुणाविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शाळेत जात असताना पाठलाग करून तिचा हात पकडून माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला सोडणार नाही अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला.

तसेच ही मुलगी दुसऱ्या दिवशी शाळेत जात असताना संशयित  गोरख कोळी  याने तिच्या अंगावर चिठ्ठी फेकून ‘तु जर चिठ्ठी उचलली नाही तर तुला मारुन टाकेल’ अशी धमकी दिली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला पोस्को कायद्या अंतर्गत पुढील तपास म. पो. कॉ. शामिना पठाण या करित आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button