गुन्हेजळगाव

अमळनेरमध्ये महसूल विभागाची धडक कारवाई; वाळूच्या बेकायदेशीर वाहतुकीवर डंपरसह ५.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेरमध्ये महसूल विभागाची धडक कारवाई; वाळूच्या बेकायदेशीर वाहतुकीवर डंपरसह ५.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमळनेर: अमळनेर शहरातील वाडी चौकाजवळ महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर धडक कारवाई करत टाटा कंपनीचा डंपर आणि ६ ब्रास वाळू असा एकूण ५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसील कार्यालयाचे ग्राम महसूल अधिकारी अशफाक अख्तर पिंजारी (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.५० वाजेच्या सुमारास वाडी चौकाजवळील फरशी पुलावर संशयित डंपरची तपासणी करण्यात आली. त्यावेळी टाटा डंपर (क्रमांक MH-46-F-1860) मध्ये सुमारे ६ ब्रास वाळू भरलेली आढळून आली.

चालक आदेश कैलास पाटील (वय २६, रा. धार, ता. अमळनेर) याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने ५ लाख रुपयांचा डंपर आणि ४२ हजार रुपये किमतीची वाळू जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ४०५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) व ३०५(e) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रमोद नामदेव पाटील करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button