गुन्हेजळगाव

जामदा फाट्यावर बसची धडक; २९ वर्षीय तरुणीचा मृत्यू

जामदा फाट्यावर बसची धडक; २९ वर्षीय तरुणीचा मृत्यू

चाळीसगाव : जामदा फाट्यावर बसची धडक बसल्याने २९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. प्राची महेंद्र पवार (२९, रा. नवेगाव, मेहुणबारे) असे मृत तरुणीचे नाव आहे.

प्राची पवार ही चाळीसगाव येथील काकूला भेटण्यासाठी सकाळी घरातून निघाली होती. जामदा फाट्यावर ती थांबलेली असताना धुळ्याकडून येणाऱ्या एमएच ४९, बीझेड ८२७६ क्रमांकाच्या बसने तिला धडक दिली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच तिचे वडील महेंद्र पवार घटनास्थळी पोहोचले. प्राची बेशुद्ध अवस्थेत होती. कुटुंबीयांनी तिला रुग्णवाहिकेतून मेहुणबारे येथील रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

याप्रकरणी महेंद्र नारायण पवार यांच्या फिर्यादीवरून बसचालक नीलेश अशोक सोळंके (रा. वलठाण, ता. सोयगाव) याच्याविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button