
जळगाव पोलिस दलात तीन निरीक्षकांच्या नियुक्ती
जळगाव : जिल्हा पोलिस दलातील प्रशासकीय कारणास्तव तीन पोलिस निरीक्षकांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ६ सप्टेंबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला.
रायगड येथून हजर झाल्यानंतर पोलिस निरीक्षक निवृत्ती भिमराव बो-हाडे यांची जामनेर पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा येथून हजर झाल्यानंतर पोलिस निरीक्षक शरद उत्तमराव शेवाळे यांच्याकडे जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक नितीन सुदाम पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखा, जळगावच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील तरतुदींनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या अधिकाराचा वापर करून या नियुक्त्या करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नवीन नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी हजर होऊन कर्तव्य स्वीकारावे आणि अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.



