जळगाव

धरणगाव तालुक्यात भीषण अपघात : पित्याचा मृत्यू, मुलगी व सहप्रवासी गंभीर

धरणगाव तालुक्यात भीषण अपघात : पित्याचा मृत्यू, मुलगी व सहप्रवासी गंभीर

जळगाव मीडिया न्यूज डेस्क l  अमळनेरहून एमबीए सीईटीची परीक्षा देऊन परतत असताना पिंप्रिं गावाजवळ भरधाव बोलेरोने दिलेल्या धडकेत रामेश्वर कॉलनीतील महेश सोनार (वय ४५) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलगी नयना सोनार व सहप्रवासी राजेश धूत हे गंभीर जखमी झाले आहेत.

शनिवारी दुपारी १.३० वाजता हा अपघात झाला. तिघांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र महेश सोनार यांना मृत घोषित करण्यात आले. अपघातानंतर रुग्णालयात आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले.

धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महेश सोनार यांच्या निधनाने रामेश्वर कॉलनीत शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button