जळगाव

दारूच्या नशेत वृद्धाला कुऱ्हाडीच्या दांड्याने बदडले! 

जळगाव : दारुच्या नशेत  एका 64 वर्षीय वृद्धाला द तुकाराम पूना कोळी (वय ६४, रा. कानसवाडा) यांना संशयित वासुदेव रघुनाथ सोनवणे (रा. कानसवाडा, ता. जळगाव) यांनी कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील कानसवाडा येथे तुकाराम पूना कोळी हे वृद्ध वास्तव्यास आहे. दि. ५ जानेवारी रोजी सायंकावळी त्यांच्या गोठ्यामध्ये दारुच्या नशेत असलेल्या वासुदेव सोनवणे यांनी कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने कोळी यांच्या पाठीवर आणि डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले. दरम्यार, तुकाराम कोळी यांनी रुग्णालयता उपचार घेतल्यानंतर नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित वासुदेव रघुनाथ सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ अनिल देशमुख हे करीत आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button