गुन्हेजळगाव

कर्जबाजारी झालेल्या नातवाने केले आजीवर कुऱ्हाडीने वार ; धरणगाव शहरातील थरारक घटना

कर्जबाजारी झालेल्या नातवाने केले आजीवर कुऱ्हाडीने वार ; धरणगाव शहरातील थरारक घटना

धरणगाव (प्रतिनिधी): धरणगाव शहरात गुरुवारी (दि. २६ जून) दुपारी एक धक्कादायक घटना घडली, ज्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. शेअर मार्केटमधील कर्जाच्या वादातून नातवाने आपल्या ७० वर्षीय आजीवर कुऱ्हाडीने वार करत तिला गंभीर जखमी केले. जखमी लीलाबाई रघुनाथ विसपुते (रा. महाबळ, जळगाव) यांच्यावर सध्या जळगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, धरणगाव पोलिसांनी संशयित नातवाला अटक केली आहे.

पोलिस सूत्रांनुसार, लीलाबाई या आपल्या मुलीच्या घरी, वैशाली पोतदार (रा. धरणगाव) यांच्याकडे आल्या होत्या. वैशाली यांचा मुलगा तेजस पोतदार हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होता. परंतु, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज  झाल्याने कुटुंबात वारंवार वाद होत होते. गुरुवारी दुपारी सव्वा तीनच्या सumarास तेजस आणि लीलाबाई यांच्यात पुन्हा एकदा तीव्र शाब्दिक बाचाबाची झाली.

यानंतर लीलाबाई झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेल्या.त्यानंतर तेजसने कुऱ्हाड हाती घेतली आणि झोपेत असलेल्या आजीवर अचानक हल्ला केला. त्याचा भाऊ अक्षयने तेजसला कुऱ्हाड घेऊन जाताना पाहिले होते. तेजसने अक्षयला “पिंपळाचं झाड तोडायला चाललोय” असे खोटे सांगितले. मात्र, काही वेळातच त्याने आजीवर हल्ला केल्याचा बनाव करत अक्षयकडे धाव घेतली. लीलाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.या प्रकरणी लीलाबाई यांचे नातू उमेश धीरेंद्र विसपुते यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार, तेजस विलास पोतदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button