
राज्यात पोलीस निरीक्षक व सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या
८७३ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी
मुंबई प्रतिनिधी
मुंबई जळगाव प्रतिनिधी l
राज्यातील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश मंगळवारी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले. एकूण ८७३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यामध्ये ५०३ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ३७० पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
या बदल्यांमध्ये आंतरजिल्हा विनंती बदल्यांचा समावेश असून, अनेक अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने विविध जिल्ह्यांत बदलीसाठी अर्ज सादर केले होते. त्यानुसार हे आदेश निर्गमित झाले आहेत.
मुंबई पोलीस दलातही विविध जिल्ह्यांतून अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक सचिन माने, सुनील सिंह पवार, चंद्रकांत सरोदे, रवींद्र वाणी, दादसाहेब घुटुकडे, राकेश मानगावकर यांचा समावेश आहे.
बदल्यांमुळे विविध जिल्ह्यांतील पोलीस दलात नव्याने ऊर्जा संचारली असून, कायदा आणि सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.