जळगाव

जळगावच्या बसस्टैंडवर पाकीटमारी करणारे अमरावतीचे तिघे भामटे जेरबंद!

जळगाव एलसीबीची कारवाई

प्रतिनिधी | जळगाव

बस स्थानकामध्ये झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या खिशामधून पाकीट रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीला जळगावच्या एलसीबीने सीताफिने अटक केली असून त्यांच्या कडून सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नवीन बस स्थानक पप्रवा घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी एलसीबीच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. शरद बागल, पो.कॉ. अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील व रविंद्र कापडणे यांच्या पथकाने कारवाई केली.

पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास संशयित हालचाली करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी बसस्थानकात खिसे कापल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत – अहमद बेग कादर बेग (६२), हफिज शाह हबीब शाह (४९) आणि अजहर हुसैन हफर हुसेन (४९), तिघेही अमरावती येथील रहिवासी.

पोलिसांनी आरोपींच्या अंगझडती व वाहनाची झडती घेतली असता, ३३ हजार ८३० रुपये रोकड, १७ हजार ५०० रुपये किमतीचे पाच मोबाईल, एक रेक्झीन बॅग आणि ५ लाख रुपये किमतीची इंडीका कार असा सुमारे ५ लाख ५३ हजार ८३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा तपास जिल्हापेठ पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button