माजी महापौर ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर! समर्थकांमध्ये आनंदाची लहर कायदेशीर लढ्याचा मोठा मोड

जळगाव मीडिया प्रतिनिधी: ललित कोल्हे हे जळगावमधील बोगस कॉल सेंटर आणि विदेशतील नागरिकांची आर्थिक फसवणूक या गुन्ह्याप्रकरणी अटकेत होते. या प्रकरणात जळगाव न्यायालयाने त्यांची काही वेळेला न्यायालयीन कोठडी वाढवली होती, तर बऱ्याच वेळा जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळले होते. त्यामुळे कोल्हे आणि त्यांच्या वकिलांनी अखेर सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन कायदेशीर लढा चालवला.
निवडणुकीत थेट यश
राजकारणाबरोबरच न्यायालयीन प्रक्रियेत असतानाही ललित कोल्हे यांनी नवीन जळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग ११ मधून उमेदवारी दाखल केली आणि कारागृहातूनच निवडणूक लढवली. अंतिम निकालात त्यांना विजय मिळाला, ज्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण होत होती.
अखेर मिळाला दिलासा
सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर ललित कोल्हे यांना जामीन मंजूर केला आहे. या निर्णयाने कारागृहातला दीर्घ काळ संपत असून त्यांच्या कुटुंबीय, पक्ष समर्थक आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लवकरच कोल्हे कारागृहाबाहेर येऊन नगरराजकारणात अधिक सक्रिय स्वरूपात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



