गुन्हेजळगाव

गावठी पिस्तूल घेऊन तरुणाने घातला गोंधळ ; शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव  प्रतिनिधीI हळदीच्या कार्यक्रमात गावठी पिस्तूल स्वतःजवळ बाळगून शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथील मंगल कार्यालयात दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे

गावठी कट्टा मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना दिल्यानंतर. शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रामचंद्र शिखरे, सहायक उपनिरीक्षक सुनील पाटील, हवालदार किशोर निकुंभ, प्रफुल्ल धांडे, भास्कर ठाकरे यांनी मंगल कार्यालयात धाव घेतली. अतुल तांबे याने त्याच्याकडे असलेल्या बॅगेतून गावठी बनावटीचे पिस्तुल काढून दिले. त्याच्यासोबत दोन जण याची माहिती मिळाली असून दोघे पळून गेलेल्या  एकाचे नाव माया तर दुसऱ्याचे माहिती नसल्याचे त्याने सांगितले.

हवालदार उमेश भांडारकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अतुल तांबे, माया आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे करीत आहेत.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button