गुन्हेजळगाव

सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तीन हजाराची लाच स्वीकारणारा तलाठी जाळ्यात

जळगाव प्रतिनिधी :-सातबारा उताऱ्यावर आई आणि भावाचे नाव लावण्यासाठी प्रथम पाच नंतर चार आणि तडजोडी अंती तीन हजाराची लाच स्वीकारताना कुसुंबा येथे तलाठ्याला जळगावच्या एसीबीने अटक केली असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.नितीन शेषराव भोई (वय ३१ वर्षे) असे लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदाराने त्यांचे आई व भावाचे नाव सातबारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टरवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. मात्र यासाठी  तलाठी नितीन शेषराव भोई याने ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

याबाबतची तक्रार तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे 7 जानेवारी रोजी केली होती. या तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता तलाठी नितीन भोई याने सातबारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी सुरुवातीला पाच हजार तर नंतर चार व तडजोडी अंति 3000 रुपयांची मागणी केली. त्यानुसार आज 7 जानेवारी रोजी तलाठी नितीन भोई हा तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आला. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ही कारवाई  पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, फौजदार सुरेश पाटील, पोना बाळू मराठे, पोकॉ अमोल सूर्यवंशी यांनी केली आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button