रावेर, दि.१४ – रावेर-यावल मतदारसंघातील जनतेशी माझी नाळ जुळली असून भूमिपुत्राला भरभरून आशीर्वाद लाभत आहे. आश्वासने देण्याचे काम मला कधीही जमले नसून मतदार संघाचा विकास करण्याचे ध्येय घेऊनच मी आपल्याकडे मते मागणीसाठी आलो आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत जात, धर्म न बघता प्रत्येकाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून गावकऱ्यांचे मिळत असलेले प्रेम व आशीर्वाद हिच माझ्या कार्याची खरी ओळख असून मी जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महाशक्तीचे रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी केले.
रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांचा ग्रामीण भागात प्रचार सुरु असून बॅट हे त्यांचे चिन्ह आहे. प्रचारार्थ गावात फिरत असताना जनतेशी सुसंवाद साधतांना ते बोलत होते. मंगळवारी बोरखेडा गावातून प्रचाराला सुरुवात केल्यानंतर अनिल चौधरींनी तामसवाडी, भोकरी, केऱ्हाळा, पिंप्री, मंगरूळ, मोहगन, रामजीपूर, बक्षीपूर, खिरोदा, रसलपूर गावात दिवसभरात प्रचार केला.
*जीपवरून निघाली मिरवणूक, मतदारांनी वेधले लक्ष*
प्रचारार्थ फिरत असताना रसलपूर गावात आल्यावर मतदार आणि समर्थकांनी अनिल अनिल चौधरी यांची खुल्या जीपवरून मिरवणूक काढली. या मिरवणुकीला ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून अनिल चौधरी यांचे स्वागत करण्यात येत होते. सर्वत्र अनिल चौधरी यांच्या घोषणा आणि जल्लोषाने वातावरण भारलेले होते. गावकऱ्यांच्या या उत्साहाने आणि समर्थनाने मी अधिक जोमाने काम जनसेवा करेल असा विश्वास अनिल चौधरी यांनी व्यक्त केला.
*यांची होती उपस्थिती*
प्रचारात फिरोज शेख, गणेश बोरसे, राम कुकडे, गोकुळ कोळी, कल्पेश खात्री खत्री, करीम मन्यार, भरत लिधुरे, विलास पांडे, बिलाल शेख, तुकाराम बारी, नंदकिशोर सोनवणे, विकास पाटील, खेमचंद कोळी, सचिन झाल्टे, लतीफ खान, शुभम पाटील, सागर चौधरी, मनोज करंकाळ, दिलीप बंजारा, विनोद कोळी, अनिल चौधरी, अय्युब पहेलवान, मोहसीन शेख, विजय मिस्तरी, रवी महाजन, हाजी हकीम सेठ, राकेश भंगाळे, अनंत जोशी, बंटी मंडवाले, विक्की काकडे, सचिन कोळी, रमजान तडवी, रोनक तडवी, सुधाकर भिल्ल, सचिन महाजन, संतोष चौधरी, चेतन वायकोळे, गोलू मानकर यांच्यासह रावेर व यावल तालुक्यातील पदाधिकारी व परिवर्तन महाशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.