गुन्हेजळगावराज्य

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना पदोन्नती

मुंबई /जळगाव : राज्यातीलआ यपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती झाल्या आहे. यामध्ये राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असून जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची देखील पदोन्नती झाली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले.

गेल्या वर्षभरापुर्वी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पदभार स्विकारला होता. त्यानंतर राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अहमदनगरचे

पोलीस अधीक्षक राकेश ओला, बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त कृष्णकांत उपाध्याय, उप आयुक्त प्रवीण मुंढे, पुणे शस्त्र निरीक्षण शाखा पोलीस अधीक्षक तेजस्वी बाळासाहेब सातपुते, नांदेड नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, बृहन्मुंबईचे उपआयुक्त डी. ए. गेडाम, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञात व परिवहन विभाग पुणे पोलीस अधीक्षक राजा. आर., पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंड प्राचार्य एन. टी. ठाकूर यांचा समावेश आहे. त्यांच्या पदोन्नतीचे आदेश गुरुवारी गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काढले.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button