एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
जळगाव | प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष परवेज पठाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी अजमत भाई, शैलेश भाई, वसीम भाई (अल्पसंख्याक उपाध्यक्ष), अफसर शेख, खलील शहा, मुस्ताक दादा, शाहीद भाई, वाफ भाई, नुरे इलाही सर, रोशन बाबा, इजाज सर, फकीरा बाबा, नईम मिर्झा, दानिश मौलाना, योगेश भाऊ आणि शरीफ खाटिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांनी पर्यावरणाचे वाढते महत्त्व लक्षात घेता प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला.
यावेळी मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचे सांगत नागरिकांना अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. तसेच ‘सबका साथ, सबका विकास’ हा संदेश देत सामाजिक एकता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सर्व मान्यवर व नागरिकांचे आभार व्यक्त केले.


