धरणगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण मॅग्मोच्या राज्य सहसचिवपदी

धरणगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण मॅग्मोच्या राज्य सहसचिवपदी
जळगाव | प्रतिनिधी धरणगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी गट अ (मॅग्मो) संघटनेच्या राज्य सहसचिवपदी निवड झाली आहे. मॅग्मो ही शासनमान्य संघटना असून, सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हक्कांसाठी कार्यरत आहे.
मुंबईत झालेल्या बैठकीत डॉ. चव्हाण यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मॅग्मोचे राज्याध्यक्ष डॉ. राहुल कन्नमवार, सरचिटणीस डॉ. संतोष हिंडोळे, मुख्य समन्वयक डॉ. निलेश टापरे आणि कोषाध्यक्ष डॉ. राजेंद्र पवार उपस्थित होते.
डॉ. चव्हाण यांनी यापूर्वी जिल्हा आणि विभागीय स्तरावर संघटनेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हक्कांसाठी काम केले आहे.डॉ. चव्हाण यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि जिल्हा हिवताप अधिकारी अशा विविध पदांचा अनुभव घेतला आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाला पाहता मॅग्मोने त्यांच्यावर राज्य सहसचिवाची जबाबदारी सोपवली आहे.जळगाव जिल्हा मॅग्मो कार्यकारणी आणि कस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने डॉ. चव्हाण यांचा सत्कार करून अभिनंदन केले.