
माजी नगरसेवक यांचा ८० हजारांचा मोबाईल चोरी
चार महिलांविरोधात एमआयडीसी पोस्टेला गुन्हा दाखल
प्रतिनिधी | जळगाव
शहरातील माजी नगरसेवक राजेंद्र झिपरू पाटील यांचा ८० हजार रुपयांचा महागडा मोबाईल फोन कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केटमध्ये शनिवारी सकाळी चोरीस गेला. याप्रकरणी चौघी महिलांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२४ मे रोजी सकाळी ९.३० वाजता राजेंद्र पाटील हे नेहमीप्रमाणे भाजी खरेदीसाठी भाजीपाला मार्केटमध्ये गेले होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत लल्ली रमजान जोगी (वय २७), पुजा रज्जू जोगी (रा. अमठी, उत्तर प्रदेश, ह. मु. ममता बेकरी, जळगाव) व त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या खिशातून मोबाईल चोरून नेल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर पाटील यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीसांनी सायंकाळी सात वाजता या चौघींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहेत.